Mon, Aug 19, 2019 01:24होमपेज › Pune › डॉक्टरांविरूध्द खटला चालविण्याचा आदेश सत्र न्यायालयाकडून रद्द

डॉक्टरांविरूध्द खटला चालविण्याचा आदेश सत्र न्यायालयाकडून रद्द

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 10 2018 1:15AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

तत्कालीन नगरसेविका राजश्री आंदेकर यांच्या मृत्यूप्रकरणी प्रथमवर्ग न्यायालयाने खटला चालविण्याचा दिलेला आदेश सत्र न्यायालयाने रद्द ठरविला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी फेटाळून लावला आहे. 

डॉ. सुहास कलशेट्टी (45, रा. कल्याण कॉम्प्लेक्स, नवी मंगळवारपेठ), डॉ. शंकर माळी उर्फ ज्ञानेश्वर कोळी (33, रा. नवनाथनगर, धनकवडी), डॉ. प्रदिप डिकोस्टा (44, रा. पदमजी पार्क, नानापेठ) आणि डॉ. अनिकेत जोशी (45, रा. निवृत्तीनाथ सोसायटी, मुकुंदनगर) यांच्या विरूध्द न्यायालयाने खटला चालविण्याचा आदेश दिला होता. तो प्रथमर्व न्यायालयाचा आदेश न्यायालयाने रद्द ठरवला आहे. याबाबत राजश्री आंदेकर यांचे जावई गणेश लक्ष्मण कोमकर (35, रा. नानापेठ) यांनी प्रथमवर्ग न्यायालयात अर्ज दाखल केला होता. राजश्री आंदेकर यांचा रूग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला होता. त्यांचा झालेला मृत्यू हा डॉक्टरांचा निष्काळजीपणा असल्यामुळे तक्रारदारांनी प्रथमवर्ग न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यानुुसार न्यायालयाने भादवि कलम 304 (अ) नुसार डॉक्टरांवर खटला चालविण्याचा आदेश दि. 25 सप्टेंबर 2017 रोजी दिला होता. परंतु, प्रथमवर्ग न्यायालयाने दिलेल्या आदेशात त्रुटी असल्याने डॉक्टरांच्या वतीने अॅड. हर्षद निंबाळकर, अॅड. राहुल दिंडोकर आणि अॅड. ऋषिकेश कांबळे यांनी पनर्निरीक्षण अर्ज दाखल केला होता.  जेकब मॅथ्यू विरूध्द सरकार या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यापूर्वी मेडीकल बोर्डाचा अहवाल घेणे आवश्यक होते. परंतु, या प्रकरणात अशा पध्दतीने डॉक्टरांच्या समितीचा अहवाल घेण्यात आला नाही. प्रथमवर्ग न्यायालयाने खटला चालविण्याचे आदेश देण्यापूर्वी ससून येथील डॉक्टरांच्या समितीचा अहवाल न मागविताच हा आदेश दिला असल्याचा वकिलांनी युक्तीवाद केला. हीच बाब ग्राह्य धरून न्यायालयाने डॉक्टरांनी केलेला पुनर्निरीक्षणाचा अर्ज मान्य केला. याप्रकरणात पुन्हा नव्याने मेडीकल बोर्डाचा अहवाल घेऊन प्रकरण निकाली काढण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायालयाला दिले आहेत. पोलिसांनी ससून येथील डॉक्टरांकडून मागविलेला अर्ज डॉक्टरांच्या बाजूने आल्याने पोलिसांनी हे प्रकरण दफ्तरी दाखल करून निकाली काढळे.