Sat, Nov 17, 2018 08:24होमपेज › Pune › ५०० रुपयांची लाच घेताना जिल्हा व्यवस्थापकाला अटक

५०० रुपयांची लाच घेताना जिल्हा व्यवस्थापकाला अटक

Published On: Jun 07 2018 4:32PM | Last Updated: Jun 07 2018 4:32PMपुणे : प्रतिनिधी 

राज्य सरकारने माफ केलेल्या महात्मा फुले विकास महामंडळाच्या कर्जाचा सातबाऱ्यावरून बोजा कमी केलेल्या रकमेची दाखल्यामध्ये नोंद करण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेताना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकाला रंगेहात पकडण्यात आले. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कार्यालयातच सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. सुनिल लक्ष्मण काची, (वय 44 वर्ष , पुणे)  असे पकडलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदार यांनी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून कर्ज घेतले होते. महामंडळाकडून घेतलेली सर्व कर्जे राज्य सरकारने माफ केली आहेत. तक्रारदार यांचे कर्जाचा बोजा ७/१२ उतार्यावरून कमी केल्याचा दाखला महामंडळाकडून घेतला होता. मात्र त्यात रकमेचा उल्लेख नव्हता. तो उल्लेख करण्यासाठी पाचशे रुपयांची लाच काची यांने केली होती. त्यानंतर पडताळणी करून गुरुवारी दुपारी सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.