Tue, Jul 16, 2019 11:44होमपेज › Pune › धनगर समाजाचे बारामती धरणे

धनगर समाजाचे बारामती धरणे

Published On: Aug 14 2018 12:55PM | Last Updated: Aug 14 2018 12:55PMबारामती : प्रतिनिधी

घटनेने दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी धनगर समाजाकडून मंगळवारी (दि. १४) सकाळी ११ वाजलेपासून बारामती तहसील कार्यालयापुढे एक दिवसीय धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. 

घटनेने धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण दिले असताना गेल्या ६० वर्षापांसून शासनाने समाजाला अनुसुचित जमातीची प्रमाणपत्रे दिलेली नाहीत. घटनेने दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी एवढीच आमची मागणी आहे, असे समाजाकडून सांगण्यात आले. त्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. धनगर समाजाने तालुक्यातून रॅली काढत या धरणे आंदोलनात सहभाग घेतला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही सायंकाळपर्यंत आंदोलनस्थळी भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.