होमपेज › Pune › नायगाव वाळूचोरीप्रकरणी 10 जणांवर गुन्हे

नायगाव वाळूचोरीप्रकरणी 10 जणांवर गुन्हे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

देऊळगावराजे : वार्ताहर 

दौंड तालुक्यातील नायगाव येथील भीमा नदीपात्रातून वाळूचोरी केल्याप्रकरणी रात्री उशिरा 10 जणांवर वाळूचोरीचे गुन्हे दाखल झाले असून हे गुन्हे दाखल होण्यासाठी 12 तासांचा प्रदीर्घ काळ लागल्यामुळे चार आरोपींच्या नावाची काटछाट झाल्याची चर्चा आहे. तसेच मागील तीन दिवसांपूर्वी शिरापूर येथील वाळूचोरी प्रकरणी चोरी गेलेल्या वाळूची किंमत 6 हजार रुपये प्रतिब्रासप्रमाणे, तर नायगाव येथील भीमा नदीपात्रातून चोरी गेलेल्या वाळूची किंमत 3 हजार रुपये प्रतिब्रास प्रमाणे महसूल विभागाने लावल्यामुळे दौंड महसुलाच्या कारभाराबाबत शंका उपस्थित होत आहे. 

तसेच फिर्यादी गाव कामगार तलाठी दुपारी पोलिस स्टेशनला हजर असताना रात्री 10 वाजेपर्यंतही फिर्याद दाखल न झाल्याने पोलिस प्रशासनाचा कारभाराबाबतदेखील संशय निर्माण होत आहे. नायगावचे तलाठी दीपक पांढरपट्टे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते स्वतः मंडलाधिकारी मंगेश नेवसे व कोतवाल रोहिदास कांबळे हे भीमा नदीपत्रकडे गेले असता उजनी संपादित गट नं. 99 मधून वेगवेगळ्या ठिकाणी वाळू उपसा करून त्याचा वाळूसाठा वेगवेगळ्या ठिकाणी केलेला आढळला. त्याचे मोजमाप केले असता अंदाजे 165 ब्रास वाळूचा अनधिकृत साठा केल्याचे त्यांना आढळून आले. त्यानंतर त्यांनी

अधिक चौकशी केली असता आरोपी महेश कोकरे, रसिक पाटील दोघेही (रा. टाकळी, ता. करमाळा जि. सोलापूर), शंकर कवडे (रा. कात्रज, ता. करमाळा, जि. सोलापूर), भारत बंडगर , नंदू बंडगर दोघेही (रा.बंडगरवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे), संदीप काळे (रा. शिरापूर, ता. दौंड, जि. पुणे), दत्ता गायकवाड (रा. जिंती, ता. करमाळा, जि. सोलापूर), पप्पू गायकवाड (रा. बाभूळगाव, ता. कर्जत, जि. नगर), बाळू गायकवाड, संजय देवकाते (दोघेही रा. मदनवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) वरील सर्व आरोपींची पूर्ण नावे माहीत नाहीत, यांनी बोटींच्या सहाय्याने 165 ब्रास वाळू प्रतिब्रास 3 हजार रुपयांप्रमाणे 4 लाख 95 हजार रुपयांची शासकीय वाळू बेकायदेशीर उत्खनन करून चोरून नेल्याप्रकरणी सरकारतर्फे तलाठी पांढरपट्टे यांनी फिर्याद दिली आहे.
 

 

 

tags : deulagavaraje,news,Crime, against, 10, accused,case,sand, theft,


  •