Mon, Aug 19, 2019 18:37होमपेज › Pune › बँकांकडून दहाची नाणी घेण्यास स्पष्ट नकार

बँकांकडून दहाची नाणी घेण्यास स्पष्ट नकार

Published On: Jun 13 2018 1:34AM | Last Updated: Jun 13 2018 1:34AMवाघोली : वार्ताहर

वाघोली ( ता. हवेली ) येथील काही बँका दहा रुपयाची नाणी स्वीकारण्यास नकार देत असल्यामुळे सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. आयडीबीआय बँक, महाराष्ट्र बँक दहा रुपयाचे नाणी घेण्यास ग्राहकांना स्पष्ट नकार देत आहेत. त्यामुळे सामन्य ग्राहकांना या पैशाचे करायचे काय असा प्रश्‍न पडला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ग्राहकांना दैनंदिन व्यवहारासाठी अडचण निर्माण होऊ नये म्हणून दहा रुपयाच्या नाण्यांची निर्मिती केली. दहा रुपयाची नाणे चलनातून बाद झाल्याची अफवा काही नागरिक, व्यापार्‍यांकडून पसरविली जात आहे. बाजारामध्ये अनेक ठिकांनी दुकानदार, व्यापारी, पंप चालक दहा रुपयाची नाणी नाकारत असतांनाचे चित्र आहे.  पाच किंवा दहा रुपयांचे चलनी नाणे व्यवहारातून बाद झालेले नसतांना देखील खुद्द बँकाच नाणी घेण्यास नकार देत असतील तर त्या बँकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. बँकेकडून दहाची नाणी घेण्यास स्पष्ट नकार देवून रिझर्व बँकेचे आदेश असल्यामुळे घेता येत नाही असे सांगून पैसे स्वीकारण्यास नकार दिला जात आहे. वाघोली येथील एका ग्राहकाच्या मुलाने आयडीबीआय बँकेत खाते उघडले. दहा-दहा रुपयाचे कॉईन जमा करून आयडीबीआय बँकेत भरण्यासाठी त्याने  वडिलांना ( दि. 12 जून ) पाठवले तेंव्हा कॅशिअरने नाणी घेण्यास नकार दिला. याबाबत ग्राहकाने त्यांना तसे लेखी द्या असे म्हणताच समोर रिझर्व बँकेचे सूचनापत्र वाचा असे सांगण्यात आले. त्यावर ग्राहकाने ते इंग्रजीमध्ये आहे वाचता येत नाही असे सांगताच वाद नको म्हणून कॅशिअर महिलेनी दुसर्‍या कर्मचार्‍याकडे पाठवले. ग्राहकाने बँक व्यवस्थापकाला भेटण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची भेट होऊ शकली नसल्यामुळे ग्राहकाने थेट वरिष्ठांशी संपर्क करून बँक दहाची नाणी स्वीकारत नसल्याची तक्रात केली. त्यानंतर ग्राहकाची नाणी जमा करून घेण्यात आली असली तरी मात्र मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. ग्राहकांची दिशाभूल करणार्‍या संबधित अधिकार्‍यांवर व कर्मचार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.