Sat, Jun 06, 2020 07:47होमपेज › Pune › केईएमच्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी 

केईएमच्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी 

Published On: May 25 2018 1:30PM | Last Updated: May 25 2018 1:30PMपुणे : प्रतिनिधी

केईएमचे डॉक्टर आणि स्टाफच्या हलगर्जीपणामुळे माझ्या मुलीचा मृत्यू झाला आहे. या डॉक्टरांनी मिळून केलेला एक प्रकारचा खुनच आहे. याप्रकरणी दोन डॉक्टर आणि स्टाफवर गुन्हा दाखल करावा अशी लेखी तक्रार मृत्यू झालेल्या गौतमीचे वडिल विनायक चौधरी यांनी समर्थ पोलिस ठाण्यात केली आहे. 

गौतमी विनायक चौधरी या चार महिन्याच्या चिमुरडीचा केईएमच्या आयसीयू मधून शस्त्रक्रिया गृहात नेत असताना गुरुवारी सकाळी साडेसात वाजता मृत्यू झाला. डॉक्टर आणि स्टाफकडून हलगर्जीपणा झाल्याने गौतमीचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच पिवळे रेशनकार्ड असतानाही मोफत उपचार करण्याऐवजी पैसे जमा करण्यासाठी प्रचंड मानसिक त्रास दिला. त्यासाठी ऑपरेशनही आठवडाभर पुढे ढकलले असल्याचे सांगत परत कोणावरही अशी वेळ येऊ नये म्हणून पोलिसांत तक्रार दिल्याचे चौधरी यांनी सांगितले. 

याप्रकरणी गौतमीचे वडील विनायक चौधरी यांनी समर्थ पोलिस ठाण्यात गुरुवारी लेखी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार केईएमचे प्रशासकीय प्रमुख डॉ. विश्वनाथ येमुल, डॉ. तेहनाज चोटीवाला या डॉक्टरांसह स्टाफ, कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे म्हटले आहे. समर्थ पोलिसांनी हा तक्रार अर्ज दाखल करून घेत मुलीचा पोस्ट मॉर्टम रिपोर्टनुसार योग्य ती कारवाई करणार असल्याची माहिती दिली. यामुळे केईएम हॉस्पिटलच्या डॉक्‍टर आणि स्‍टापसमोरील अडचणीत वाढण्याची शक्‍यता आहे.