Fri, Apr 26, 2019 03:52होमपेज › Pune › दुधी भोपळ्याचा रस पिल्याने महिलेचा मृत्यू

दुधी भोपळ्याचा रस पिल्याने महिलेचा मृत्यू

Published On: Jun 21 2018 8:26PM | Last Updated: Jun 21 2018 8:25PMपुणे : प्रतिनिधी

शरीरासाठी आरोग्यदायी समजला जाणारा दुधी भोपळ्याचा एक ग्लास रस पिल्याने पुण्यातील एका ४१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही घटना १६ जून रोजी बाणेर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये घडली. याआधीही अशा घटना घडल्या असून त्यामुळे दुधी भोपळ्याचा रस कितपत सुरक्षित आहे, यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
गौरी शहा रा. बाणेर असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला एरंडवण्यातील एका नामांकित सॉफ्‍टवेअर कंपनीत डाटा सायंटिस्ट म्हणून काम करत होती. संबंधित महिलेने १२ जून रोजी सकाळी व्यायाम करून आल्यावर हा एक ग्लास दुधी भोपळ्याचा रस घेतला. त्यानंतर अर्ध्या तासात तिला उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला. यानंतर तिला श्‍वासोच्छवासाला त्रास, पोटात दुखू लागले.  दुपारी तिला बाणेर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, तिच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत होती. पण, नंतर मेंदुमध्ये गाठ झाली. तिचे ऑपरेशनही करणयात आले. पण पुन्‍हा गाठ झाल्याने शेवटी दिवसेंदिवस तिची प्रकृती खालावत गेली आणि शेवटी १६ जून रोजी तिचा मृत्यू झाला, अशी माहिती तिच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी दिली. 

दुधी भोपळ्याचा रस तुरट किंवा कडवट असेल तर त्याचे विष तयार होते. काकडी व तत्सम प्रकारातील हे फळ असून ते कडू किंवा तुरट असल्यानंतर पिऊ नये. तसेच हे सर्वांना माहीत आहे. वजन कमी करणे, ह्रदविकार टाळणे या कारणांसाठी हे रस पिले जातात त्यांच्यावर बंधण येणे गरजेचे आहे.

   -डॉ. संजय ललवाणी, वैद्यकिय अधीक्षक, भारती विद्यापीठ हॉस्पिटल