पुणे : प्रतिनिधी
‘‘आम्ही आज रेल रोको करणार होतो. मात्र, उच्च न्यायालायच्या एका आदेशानुसार प्रशासनाने हा रेल रोको करण्यास आम्हाला मज्जाव केला आहे. त्यानुसार, आम्ही उच्च न्यायालयाचा आदर करतो. कोपर्डीच्या ताईला मिळालेला योग्य न्याय स्वागतार्ह आहे. कोपर्डीच्या निकाल प्रमाणे खैरलांजीच्या महिलांना देखील न्याय मिळायला हवा. दलित अत्याचाराबाबत सरकार गंभीर नाही.’’ असा आरोप भीम आर्मी संघटनेचे जिल्हा प्रमुख दत्ता पोळ यांनी केला आहे.
भीम आर्मी संघटनेतर्फे पुणे रेल्वे स्थानकावर आज दलितांना संरक्षण मिळावे, खैरलांजी प्रकरणातील दोषींना फाशी द्यावी. अशा विविध मागण्यांनसाठी आंदोलन करण्यात आले.