Thu, Feb 21, 2019 15:12होमपेज › Pune › दादा कोंडके यांचे महाराष्ट्रात पहिले स्मारक 

दादा कोंडके यांचे महाराष्ट्रात पहिले स्मारक 

Published On: Mar 14 2018 8:08PM | Last Updated: Mar 14 2018 8:13PMपुणे : प्रतिनिधी

भोर तालुक्यातील इंगवली या गावी दादा कोंडके फौउंडेशनच्यावतीने सुमारे एक हजार चौरस फुट जागेवर दादा कोंडकेंचा पुतळा उभारुन भव्यदिव्य असे स्मारक निर्माण करण्यात येणार आहे. 

दादांच्या काही वस्तू आणि फोटो यांच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीतील त्यांची कारकीर्द सचित्र स्वरुपात येथे त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. हे ठिकाण पुण्यातील एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जाणार आहे. 

संपुर्ण महाराष्ट्रात असलेला दादांचा चाहतावर्ग आणि दादांच्या चित्रपटांवर, त्यांच्या अभिनयावर प्रेम करणाऱ्या तमाम रसिकांसाठी एक श्रद्धास्थान या निमित्ताने उभे राहणार आहे. कतृज्ञता चौथरा आणि सुंदर बागेसह हे स्मारक उभे केले जाणार आहे.

या स्मारकाच्या उभारणीसाठी महाराष्ट्रातील रसिकांनी आर्थिक मदत करावी, असे दादा कोंडके मेमोरिअल फौंडेशनचे प्रमुख विश्वस्त मनोहर कोलते म्हणाले. दादा कोंडके यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.