Tue, Aug 20, 2019 04:08होमपेज › Pune › दाभोलकर हत्या प्रकरण : अमोल काळेला १४ सप्टेंबर पर्यंत कोठडी 

दाभोलकर हत्या: अमोल काळेला १४ पर्यंत कोठडी 

Published On: Sep 06 2018 2:50PM | Last Updated: Sep 06 2018 2:50PMपुणे : पुढारी ऑनलाईन

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरेकडून जप्त करण्यात आलेले पिस्तूल अमोल काळे यानेच पुरवले असल्याची माहिती बचाव पक्षाने केलेल्या युक्तिवादनंतर न्यायालयात स्पष्ट झाली. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी काळे याला १४ दिवसांची सीबीआय कोठडी द्यावी अशी मागणी सीबीआयच्या वकिलांनी यावेळी केली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम एस ए सय्यद यांनी काळे याची १४ सप्टेंबर पर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी केली.

काळे याच्या कोठडीची मागणी करताना ढाकणे यांनी न्यायालयाला सांगितले की, उच्च न्यायालयाने या प्रकरणाबाबत एक आदेश दिला असून न्यायालयात सुनावणी न होता संबंधित केसमधील केस डायरी, न्यायालयानत सादर करण्यात यावी त्यानुसार न्यायालयाने निर्णय दयावा. त्यामुळे सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला नाही. या प्रकरणातील तपास संवेदनशील असून त्यात करण्यात आलेल्या तपासाची माहिती मीडियाला जाऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आल्याचे समजते.

एखाद्या प्रकरणात आरोपीला अटक केली असताना कोठडी दिल्यानंतर त्याकडे दुसऱ्याच प्रकरणाची चौकशी केली जाते. अंदुरे हा बंगळुरु पोलिसांच्या कोठडीत असताना त्याच्याकडे दाभोलकर प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. ज्या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे त्या प्रकरणाचा त्याकडे तपास करावा असा गुजरात उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा निर्वाळा यावेळी ॲडव्होकेट धर्मराज यांनी दिला. चौदा दिवसांची पोलीस कोठडी दिल्यास आरोपीकडे दुसऱ्याच प्रकरणांची चौकशी करण्यात येत आहे, त्यामुळे त्याला कमीत कमी कोठडी द्यावी, अशी मागणी धर्मराज यांनी केली.

फॉरेन्सिक अहवालाच येणार असल्याचे कारण देत पोलिसांनी अनेकदा रिमांडची मागणी केली आहे. यापूर्वी अटक केलेला आरोपी सचिन अंदुरे १४ दिवस सीबीआय कोठडीत असताना सीबीआयने काय तपास केला याचा न्यायालयाने पोलीस कोठडी देताना विचार करावा.  १४ दिवसांच्या सीबीआय कोठडीत केवळ दोनच दिवसात पूर्ण होईल असा तपास केल्याचे धर्मराज   म्हणाले.