होमपेज › Pune › पुणे : तमाशात नाचण्यावरून दोन गटात हाणामारी

पुणे : तमाशात नाचण्यावरून दोन गटात हाणामारी

Published On: Apr 10 2018 10:42AM | Last Updated: Apr 10 2018 10:42AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड शहराला लागून पुणे ग्रामीण पोलिसांच्या देहूरोड हद्दीतील मामुर्डी येथे तमाश्यात (लोकनाट्य) नाचण्यावरून दोन गटात तूफान हाणामारी झाली. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास भैरवनाथ मंदिराच्या समोर ही घटना घडली. देहूरोड पोलिसात १६ जणांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजा राऊत, गोटू राऊत यांच्यासह १६ जणांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी  प्रमोद गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मामुर्डी गावात दोन दिवसांपासून भैरवनाथाच्या यात्रा सुरु आहे. यानिमित्ताने लोकनाट्याचे (तमाशा) आयोजन करण्यात आले होते. सोमवारी रात्री तमाशा सुरू झाला. यावेळी गायकवाडचे मित्र नाचत असताना राजा राऊत आणि गोटू राऊत यांच्या मित्रांमध्ये नाचण्यावरून धक्काबुक्की झाली. त्यानंतर त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. यात गायकवाड आणि राऊत यांच्या गटात तुफान हाणामारी झाली. त्यानुसार प्रमोद गायकवाड यांनी १६ जणांविरोधात देहूरोड पोलिसात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. तपास देहूरोड पोलिस करत आहेत.