Tue, Apr 23, 2019 09:36होमपेज › Pune › पुण्यात कोट्यवधी रुपयांचा गुटखा जप्‍त

पुण्यात कोट्यवधी रुपयांचा गुटखा जप्‍त

Published On: Mar 16 2018 7:15AM | Last Updated: Mar 16 2018 7:24AMपुणे : देवेंद्र जैन

संपूर्ण राज्यात गुटख्यावर बंदी असताना पुणे शहर व जिल्‍ह्यात राजरोसपणे गुटख्याची विक्री सुरु असल्यामुळे प्रशासन दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. गुटखा विक्रेत्याकडून करोडोंचे हप्ता मिळत असल्यामुळे कारवाई होत नसल्याचे सांगितले जात आहे.

पुणे शहर गुण्हे अन्‍वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे व त्यांच्या सहकार्यांनी, आज पहाटे मोशी येथे कोट्यवधी रुपये किंमतीचा गुटख्याची पोती भरलेले चार ट्रक पकडले. अन्न व औषध प्रशासननाच्या अधिकार्‍यांनी या मालाची तपासणी करून तो गुटखा असल्याने जप्त करण्यात आला असल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या गुटख्याच्या मालाची मोजदाद सुरु आहे. पुणे पोलिसांची ही कारवाई राज्यातील सर्वात मोठी असल्याचे सांगितले जात आहे. आळंदी येथील गुटख्याच्या व्यापाराकरीता कुप्रसिद्ध असलेला पंकज बलदोटा व बोरु्ंदीया या दोघांचा माल असून हा गुटखा गुजरात येथून पुणे जिल्‍हा व शहरात विकण्यासाठी आणला जात आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेच्या अप्पर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलिस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या अमली विरोधी पथकाने व अन्न व औषध प्रशासननाच्या अधिकार्‍यांनी केली आहे.