Wed, Nov 14, 2018 05:53होमपेज › Pune › वाकडमध्ये दहशत करणारा 'गंग्या' तडीपार 

वाकडमध्ये दहशत करणारा 'गंग्या' तडीपार 

Published On: May 22 2018 12:53PM | Last Updated: May 22 2018 12:53PMवाकड(जि. पुणे) : वार्ताहर 

वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असलेल्या सराईत गुन्हेगार रोहन उर्फ गंग्या वासुदेव वाघमारे याला पोलिसांनी दीड वर्षासाठी तडीपार केले आहे. गेल्या काही दिवसांपासून छोट्या मोठ्या गुन्हेगारी कारवायामूळे गंग्याची दहशत निर्माण झाली होती. 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश माने यांच्या सुचनेनुसार पोलिस कर्मचारी सुहास पाटोळे, नाना झेंडे यांनी त्याच्या सर्व गुन्ह्यांचे रेकॉर्ड  तयार करून तडीपारीचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावरून उपायुक्त गणेश शिंदे यांनी त्यास दीड वर्ष तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.

 

Tags : pune district, criminal, tadipaar