होमपेज › Pune › पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक 

पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक 

Published On: Jul 17 2018 12:32PM | Last Updated: Jul 17 2018 12:32PMपिंपरी : प्रतिनिधी

विनापरवाना शस्त्र बाळगल्या प्रकरणी निगडी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला सापळा रचून अटक केली. रात्री आकाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सागर उर्फ एसपी अनुनाथ पोटभरे ( २९,रा.मोरेवस्ती,चिखली) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर देहूरोड व निगडी पोलिस ठाण्यात खून, मारहाण अशा एकूण सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. 

रात्री हद्दीत गस्त घालत असताना तपास पथकाचे कर्मचारी संदीप पाटील यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार पोटभरे मोरेवस्तीतील टॉवर लाईन चौकात आला असून त्याच्या कंबरेला गावठी पिस्तुल आहे. त्यांनी तात्काळ जाऊन त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्याकडे एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे मिळून आली. निगडी पोलिस पुढील तपास करीत आहेत.