Tue, May 21, 2019 05:01होमपेज › Pune › पिंपरी : अवैध शस्त्र बाळगणाऱ्या सराईताला अटक 

पिंपरी : अवैध शस्त्र बाळगणाऱ्या सराईताला अटक 

Published On: Jun 30 2018 9:50AM | Last Updated: Jun 30 2018 9:50AMपिंपरी : प्रतिनिधी

अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी सांगलीच्या विशाल मधुकर खेडेकर (वय,२४) या सराईत गुन्हेगारास देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे दोन गावठी कट्टे जप्त करण्यात आले आहेत. 

खेडेकर तळवडे ते देहूगाव रस्त्यावरील कॅनबे चौक  येथे येणार असल्याची पक्की खबर पोलिसांनी मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक सावंत, कर्मचारी उगले, जगदाळे, जाधव, शेळके यांनी सापळा रचून त्यास अटक केली. खेडेकर यापूर्वीच्या तीन गुन्ह्यांमध्ये फरार असून त्याच्यावर सांगली पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई देखील केली होती