Sat, Feb 23, 2019 22:22होमपेज › Pune › पुणे : विशेष शाखेतील निलंबित कर्मचाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा 

पुणे : विशेष शाखेतील निलंबित कर्मचाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा 

Published On: Mar 25 2018 1:52AM | Last Updated: Mar 24 2018 11:13PMपुणे प्रतिनिधी 

महिलेवर लैंगिक अत्याचाराचे  चित्रीकरण करून ते युट्युबवर अपलोड केल्याप्रकरणी पुणे पोलिस दलाच्या विशेष शाखेतून निलंबित पोलिस कर्मचाऱ्यासह दोघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. कोंढवा पोलिस ठाण्यात बलात्कार व अँट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार आसिफ कादेर पटेल (वय 47, रा. भवानी पेठ पोलिस वसाहत), सनी सुरेश डिंबर व चिराग त्रिवेदी अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला व  पटेल एकमेकांना ओळखतात. 2009 सालापासून त्याने वेळोवेळी पिडीतेवर बलात्कार केला. तसेच त्यावेळचे चित्रीकरण केले. त्यानंतर  ते युट्युबवर अपलोड केलेे. पटेल व त्याच्या दोन साथीदारांनी तिच्यावर अत्याचार करून जातिवाचक शिवीगाळ केली. अखेर या सर्व प्रकाराबाबत वरिष्ठांकडे तक्रार केल्यावर असिफ पटेलला पोलिस दलातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Tags : pune, pune news,rape case on pune spacial branch police, atrocity case, crime, cyber crime,