होमपेज › Pune › पिंपरीत सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकुळ 

पिंपरीत सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकुळ 

Published On: Jan 13 2018 10:30AM | Last Updated: Jan 13 2018 10:30AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी

हिंजवडी, वाकड, चतुःशृंगी, विश्रांतवाडी परिसरात शुक्रवारी रात्री सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. येथील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून धूम ठोकली.

विशेष म्हणजे वाकड, हिंजवडी परिसरात सोनसाखळी चोरट्यानी गेली अनेक दिवसांपासून हैदोस घातला आहे. मात्र पोलिसांना चोरट्यांना अटक करणे शक्य होत नाही. वाकड परिसरात ठीक-ठिकाणी नाकाबंदी सुरू असताना देखील चोरट्यानी पोलिसांच्या नाकावर टिचून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केले. यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस शोध घेत आहेत.