Thu, Jun 27, 2019 00:18होमपेज › Pune ›  सदार्था रीटेलची बँकेतील अडिच कोटी रूपये जप्तीचे आदेश 

 सदार्था रीटेलची बँकेतील अडिच कोटी रूपये जप्तीचे आदेश 

Published On: Apr 12 2018 1:11PM | Last Updated: Apr 12 2018 1:11PMपुणे : देवेंद्र जैन

विशेष खाजगी सावकारकी प्रतिबंघ न्यायालयाने सदार्था रीटेलचे बँकेत जमा असलेले दोन कोटी साठ लाख रुपये जप्त करण्याचे अंमलबजावणी संचालनालयाला आदेश दिले आहेत. 

आरोपी अंजना उपेंद्र चोकशी व कौस्तुभ उपेंद्र चोकशी यांनी सदार्था रीटेल लीमीटेडच्या माध्यमातून २००९ मध्ये ११०० गुतवणुकदारांची फसवणूक केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला होता. आरोपींनी त्यांच्या कंपनीचे  आय. पी. ओ ( ईनिशियल पब्लीक ऑफर) बाबत खोटे आश्वासन देउन लोकांना फसवण्याच्या उदेशाने ‘वीस दिवसात दुप्पट पैसे मीळवा’ अशी खोटी जाहीरात करुन हजारो गुंतवणुकदारांना फसवल्याचे सिद्ध झाले आहे, त्यामुळे न्यायालयाने बँकेत जमा असलेले दोन कोटी साठ लाख रुपये जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.