Wed, Nov 14, 2018 18:43होमपेज › Pune › नगरसेविका वैरागेंचे पद धोक्यात

नगरसेविका वैरागेंचे पद धोक्यात

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 1:10AMपुणे / बिबवेवाडी : प्रतिनिधी

सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका कविता भरत वैरागे यांची निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका, उच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे त्याचे नगरसेविका पद धोक्यात येण्याची शक्यता आहे.
गतवर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीत वैरागे ह्या महर्षीनगर - सॅलसबरी पार्क या प्रभाग क्र. 28 मधून अनुसूचित जाती (महिला राखीव) या प्रवर्गातून निवडून आल्या. मात्र, निवडणुकीनंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक असतानाही, त्यांनी ते वेळेत सादर केलेले नाही.

त्यावर वैरागे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा अहवाल प्रशासनाने निवडणूक आयोगाला पाठविला होता. त्यावर वैरागे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने सप्टेंबरमध्ये वैरागे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याच्या निर्णयाला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली होती. या स्थगितीस काँग्रेस पक्षाच्या उमेदवार शर्वरी गोतारणे यांनी आक्षेप घेतल्यामुळे नुकत्याच झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने नगरसेविका वैरागेंची याचिका पुन्हा फेटाळून लावली आहे. निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आठ आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. न्यायालयाच्या निकालानुसार कार्यवाही न झाल्यास, आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे शर्वरी गोतारणे यांनी दै ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.