Wed, Sep 19, 2018 22:18होमपेज › Pune › विहिरीत आढळला महाविद्यालयीन मुलाचा मृतदेह 

विहिरीत आढळला महाविद्यालयीन मुलाचा मृतदेह 

Published On: Jan 07 2018 11:23AM | Last Updated: Jan 07 2018 11:23AM

बुकमार्क करा
उरुळी कांचनः वार्ताहर

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील बाजार मैदान हद्दीतील जुन्या विहिरीत रविवारी सकाळी  एका अनोळखी  महाविद्यालयीन मुलाचा मृतदेह आढळून आला आहे.  

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित मुलाने दोन दिवसापूर्वी आत्महत्या केली असावी. अंगावरील कपड्यावरुन संबंधित मुलगा उरुळी कांचन येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी असल्याचे दिसत आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून ओळख पटविण्याचे काम चालू आहे.