Fri, Nov 16, 2018 00:51होमपेज › Pune › भोसरीत एक लाखांचे कपडे चोरीला 

भोसरीत एक लाखांचे कपडे चोरीला 

Published On: Jul 17 2018 1:19PM | Last Updated: Jul 17 2018 12:39PMपिंपरी : प्रतिनिधी

दुकानाचे शटर उचकटून एक लाख रुपये किमतीची कपडे चोरून नेल्‍याची घटना उघकीस आली आहे. हा प्रकार मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास भोसरी येथे घडला.  

या प्रकरणी दुकानमालक राजन श्रीकृष्ण सिंग ( ३०,रा. धावडेवस्ती, भोसरी) यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार चार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजन यांचे भोसरीतील सखुबाई गवळी उद्यानासमोर कपड्यांचे दुकान आहे. पहाटचे तीनच्या सुमारास चोरट्यांनी शटर उचकटून दुकानात प्रवेश केला आणि दुकानातील महागडे जीन्स आणि शर्ट असा एकूण ९६ हजार १२० रुपयांचा माल चोरून नेला.