होमपेज › Pune › भिडे, एकबोटेंवर कारवाई ऐवजी विचारवंतांची धरपकड : अशोक चव्‍हाण Video

भिडे, एकबोटेंवर कारवाई ऐवजी विचारवंतांची धरपकड : अशोक चव्‍हाण Video

Published On: Aug 30 2018 7:00PM | Last Updated: Aug 30 2018 7:13PMपुणे : प्रतिनिधी

भीमा कोरेगांव हिंसाचार प्रकरणातील भिडे गुरूजी आणि मिलींद एकबोटे, तसेच नाला सोपारा प्रकरणातील आरोपींवर सरकारकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. परंतु दुसरीकडे मात्र विचारवंतांची धरपकड केली जात आहे. ही कृती आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारकडून केली जात असल्याची टिका माजी मुख्यमंत्री आणि कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली. 

अशोक चव्हाण एका कार्यक्रमासाठी गुरुवारी पुण्यात आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सरकारकडून विचारवंतांची आणि विरोधात बोलणाऱ्यांची धरपकड केली जात आहे. या माध्यमातून सरकार दबाव तंत्राचा वापर करत आहे. दुसरीकडे मात्र सनातन संस्था, भिडे गुरूजी, मिलींद एकबोटे, नाला सोपारा प्रकरणातील संशयीत, यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. सरकारची ही कृती योग्य नाही. सरकार बोलणाऱ्यांचा आणि लिहणाऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी आणि नोटबंदी, जीएसटी यामध्ये आलेले अपयश झाकण्यासाठी व लोकांचे लक्ष इतर ठिकाणी वळवण्यासाठी सरकारकडून धरपकड केली जात आहे. मात्र आम्ही केंद्र आम्ही राज्य सरकारच्या मागील चार वर्षातील अपयश जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून जनतेसमोर मांडणार आहोत, अशी माहितीही खा. चव्हाण यांनी दिली.

यावेळी कॉग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहोन जोशी, नगरसेवक महेश वाबळे उपस्थित होते.