Fri, Apr 19, 2019 12:42होमपेज › Pune › ...म्हणून मुलींना आमच्याबरोबर घेऊन जात आहोत

...म्हणून मुलींना आमच्याबरोबर घेऊन जात आहोत

Published On: Feb 18 2018 3:08PM | Last Updated: Feb 18 2018 3:08PMपुणे : प्रतिनिधी

आत्महत्या केलेल्या दाम्पत्याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. व्यवसायात झालेला तोटा आणि कर्जबाजारीपणामुळे मी आणि पत्नी विषारी औषध पिऊन आत्महत्या करत आहोत. आमच्यानंतर  मुलींचा सांभाळ कोण करणार, हा प्रश्न आहे, त्यामुळे मुलींना आमच्याबरोबर घेऊन जात आहोत, असे चिठ्ठीत नमूद केले आहे. चौधरी कुटुंबीय हे मूळचे उत्तमनगरनजीक असलेल्या कोंढवे- धावडे गावचे  रहिवासी होते. नीलेश यांचा प्लास्टिक मोल्डींगचा व्यवसाय आहे.

सिंहगड रस्ता भागात त्यांचे कार्यालय आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांनी  शिवणे भागातील पोकळेनगर परिसरात घर घेतले होते. त्यांच्या दोन्ही मुली  कर्वे नगर परिसरातील एका नामांकित शाळेत  शिकण्यास आहेत. नीलेश यांनी त्यांच्या व्यावसायासाठी कर्ज घेतले होते. तसेच गेल्या काही दिवसांपासून नीलेश यांना व्यवसायात तोटा झाल्याने ते नैराश्यात  होते. दरम्यान नीलेश यांनी याच नैराश्यातून आधी दोन्ही मुलींना विषारी औषध पाजले. त्यानंतर दोघांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह ससून रुग्णालयात पाठवून देण्यात आले. व्हिसेरा राखून ठेवला सुसाईड नोट सापडली असून, आत्महत्या  करण्यापूर्वी मुलींना विषारी औषध पाजले असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. शवविच्छेदन केल्यानंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. त्याच्या तपासणीनंतरच दोघींच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल. हेमंत भट, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, उत्तमनगर पोलिस ठाणे