Tue, Feb 19, 2019 12:30होमपेज › Pune › पुणे: कारच्या धडकेत दोन ठार, दोन गंभीर

पुणे: कारच्या धडकेत दोन ठार, दोन गंभीर

Published On: Mar 24 2018 11:35AM | Last Updated: Mar 24 2018 11:35AMपिंपरी : प्रतिनिधी 

वेगात असणार्‍या कारची धडक बसल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू तर दुसऱ्या दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात चांदनी चौक भुगाव रस्त्यावर हॉटेल वुड्स समोर रात्री दिड वाजता झाला.

मानस उपाध्यय (वय १८) आणि कुणाल शर्मा (१८, रा. विमाननगर, पुणे) या दोघांचा मृत्यू झाला, तर शुभम मदार आणि धुर्व विश्नाई हे दोघे जखमी झाले आहेत. दर्शन जमदाडे या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानस आणि कुणाल हे दोघे शुक्रवारी मध्यरात्री भुगांव येथील हॉटेलमध्ये जेवायला निघाले होते. यावेळी समोरून येणार्‍या कारची धडक दुचकीला बसली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने दोघांचा मृत्यु झाला तर शुभम आणि धुर्व यांच्याही दुचाकीला धडक बसली. यामध्ये दोघे गभीर जखमी झाले आहेत. हिंजवडी पोलिस तपास करत आहेत.