Wed, Jun 26, 2019 11:54होमपेज › Pune › वाकड-हिंजवडीत चैन चोरट्यांची "गोल्डन सकाळ" 

वाकड-हिंजवडीत चैन चोरट्यांची "गोल्डन सकाळ" 

Published On: Dec 16 2017 3:55PM | Last Updated: Dec 16 2017 3:55PM

बुकमार्क करा

वाकड : वार्ताहर 

वाकड-हिंजवडी परिसरात चैन चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. शनिवारी सकाळी हिंजवडीसह वाकड मध्ये तीन ठिकाणी मंगळसूत्र हिसकवण्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे आजची सकाळ ही चोरट्यांसाठी 'गोल्डन' सकाळ ठररल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. 

या प्रकरणी जयश्री दत्तात्रय खोले (५५, विशालनगर, वाकड), विजयकुमार  के (६५,रा.वाकड)  यांनी वाकड पोलीस ठाण्यात तर लक्ष्मी वाडवल्ली (५८,रा.मारुंजी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयश्री खोले सकाळी दूध आणण्यासाठी जात असताना दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांचे सव्वा तोळे वजनी सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. विजयकुमार वर्तमानपत्र आणण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. वाकड दत्तमंदिर रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. हिंजवडी मध्ये देखील लक्ष्मी यांचे लक्ष्मी चौक मारुंजी रोडवर वैष्णवी हॉटेल समोर साडेपाच तोळे वजनी मंगळसूत्र हिसकावले. या घटनांमुळे महिलांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.या घटनांची पोलीस खात्यातील वरिष्ठांनी दखल घेतली असून हिंजवडी वाकड पोलिस खडबडून जागे झाले आहेत.