Tue, Nov 13, 2018 01:27होमपेज › Pune › सांगवीमध्ये चैन चोरट्यांची सकाळ  

पिंपरी : सांगवीमध्ये चैन चोरट्यांची सोनेरी सकाळ  

Published On: Jun 27 2018 10:45AM | Last Updated: Jun 27 2018 10:46AMपिंपरी : प्रतिनिधी

सांगवी मध्ये चैन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. आज सकाळी (दि. २७ जून) वटपौर्णिमेच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या चार महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसका मारून चोरून नेले आहेत. सांगवीतील कल्पतरू सोसायटी परिसरात तीन आणि पिंपळे सौदागर मिलेनियम सोसायटी जवळ एक अशा एकूण चार घटना घडल्या आहे. महिलांनी आज घराबाहेर निघताना विशेष काळजी घ्यावी तसेच दागिन्यांचे प्रदर्शन करू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.