Fri, Feb 22, 2019 09:31होमपेज › Pune › पुणे : भरधाव कारची वाहतूक पोलिसाला धडक 

पुणे : भरधाव कारची वाहतूक पोलिसाला धडक 

Published On: Jul 25 2018 2:53PM | Last Updated: Jul 25 2018 2:53PMपुणे : प्रतिनिधी 

भरधाव कारने वाहतूक पोलिसाला धडक दिल्याचा प्रकार बिबवेवाडी येथील कोंढवा जंक्शन येथे  बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला. या घटनेत वाहतुक पोलिसाला गंभीर दुखापत झाली असून त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

कारच्या धडकेत जखमी झालेल्या पोलिसाचे नाव बाळासाहेब दगडे असे नाव आहे. तर दत्तात्रय अरुण जाधव (25, हडपसर) असे चालकाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब दगडे हे वाहतूक विभागात काम करतात. ते बुधवारी सकाळी बिबवेवाडी येथील कोंढवा जंक्शन परिसरात वाहतूक नियमन करत होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास ते वाहतुकीचे नियमन करत चौकात थांबलेले असताना पांढर्‍या रंगाच्या स्विफ्ट कार (एमएच 12 केए 1436) ची त्यांना जोरदार धडक बसली. यात त्यांना डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली. त्यांना त्यांचे सहकारी कुंभार यांनी तात्काळ नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तर पोलिसांनी दत्तात्रय जाधव याला ताब्यात घेतले आहे.