Tue, Nov 20, 2018 22:07होमपेज › Pune › पार्टी जीवावर बेतली; पुण्यात दोघांचा मृत्यू

पार्टी जीवावर बेतली; पुण्यात दोघांचा मृत्यू

Published On: Mar 02 2018 8:59AM | Last Updated: Mar 02 2018 1:53PMपुणे : प्रतिनिधी

पार्टी झाल्यानंतर पुन्हा दारू पिण्यासाठी कारमधून निघालेल्या पाच मित्रांच्या कारला कात्रज ते नवले ब्रिज रोडवर भीषण अपघात झाला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, दोघे गंभीर जखमी झाले असून, एकाला किरकोळ मार लागला आहे. आज मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. दारूच्या नशेत कार चालविणाऱ्या चालकाचे भरघाव कारवरील नियंत्रण सुटून कार जाहिरातीच्या खांबावर आदळून हा अपघात झाला.

निखिल चौखुले (वय २७, रा. पन्हाळा कोल्हापूर), आशुतोष यादव मयत (वय २९ वर्षे, सांगली), अशी मृतांची नावे असून चालक सुशांत पाटील (वय २५, रा. बेलवडे, कराड), धीरज शिंदे (भिलवडी वय ३०), दिग्विजय महाजन (वय २४, ) हे तिघेही जखमी झाले आहेत. यातील मयत आणि जखमी हे एकमेकाचे मित्र आहेत. 

गुरुवरी पाचजण  त्यांच्या कारमधून रात्री साडे दहा वाजता पार्टीसाठी गेले होते. तेथे पार्टी करून ते परत आले. मात्र, त्यानंतर पुन्हा दारू आण्यासाठी ते रात्री वाजता कार घेऊन बाहेर पडले.

कात्रज चौकात दारू न मिळाल्याने कात्रज ते नवले ब्रिजकडे जाणार्‍या रस्‍त्याने निघाले होते. यावेळी सिलाई वर्ल्डच्या पुलाजवळ आल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार (फियाट कंटो कार नं एमएच.12.KN.8273) समोरील जाहिरातीच्या खांबास धडकून उतारावरून खाली जाऊन २० फूट पुलाचे उंचीवरून गाडी खाली पडली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर, दोघे गंभीर जखमी झाले.