Tue, Sep 25, 2018 04:40होमपेज › Pune › पुण्यात पुलावरून कार कोसळून कराटे प्रशिक्षक ठार

पुण्यात पुलावरून कार कोसळून कराटे प्रशिक्षक ठार

Published On: Aug 12 2018 10:00AM | Last Updated: Aug 12 2018 10:00AMपुणे : प्रतिनिधी

फुरसुंगी येथील सोनार पुलाचा कठडा तोडून कार पाण्यात पडून एका कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे घडली. नितीन निवृत्ती कुंभार (वय ४३, मुळ सासवड सध्या भेकराईनगर) असे प्रशिक्षकाचे नाव आहे. 

रविवारी पहाटे मॉर्निग वॉकला गेलेल्या नागरिकांना सोनार पुलाचा कठडा तोडून कार पाण्यात कोसळली असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर स्थानिकांनी ही कार क्रेनचा वापर करून कार बाहेर काढण्यात आली. घटनेनंतर पोलिस व अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. कार चालविणारी व्यक्ती ही नितीन कुंभार असल्याचे समोर आले. त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यांच्या कुटुंबियांना कळविण्यात आले असून मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. नितीन कुंभार हे लोणी काळभोर येथे एंजल स्कूलमध्ये कराटे प्रशिक्षक होते.