Tue, Jan 22, 2019 03:37होमपेज › Pune › तलवारीने केक कापणार्‍या सहा जणांना अटक

तलवारीने केक कापणार्‍या सहा जणांना अटक

Published On: Mar 07 2018 6:32PM | Last Updated: Mar 07 2018 7:05PMपिंपरी : प्रतिनिधी 

मित्राच्या वाढदिवसाचा केक तलवारीने कापणार्‍या सहा जणांना पोलिसांनी अटक केली, तर सहा जणांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार निगडी येथे मंगळवारी (ता. 6) सायंकाळी घडला.

शुभम अमर मारिया (18, रा. खराळवाडी, पिंपरी), सागर शिवा शिंदे (18), साहिल रमजान शेख (18, दोघेही रा. ओटा स्कीम, निगडी), संदीप मारुती लोहेकर (20, रा. पिंपरी), रामचंद्र सुनील नाफडे (19, रा. निगडी), सुमित शिवाजी कांबळे (19, रा. ओटा स्कीम निगडी) या सर्वाना अटक केली आहे. याशिवाय सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री पावणेआठच्या  सुमारास संत कबीर गार्डन, प्राधिकरण निगडी येथे काही जण तलवारीने केक कापत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तलवारीच्या आकाराएवढे दोन लोखंडी कोयते, चार वाहने, असा दोन लाख चाळीस हजार चारशे रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. पुढील तपास निगडी पोलिस करत आहेत.