Tue, May 21, 2019 04:06होमपेज › Pune › चिंचवडगाव येथे उभ्या बसला आग(व्हिडिओ) 

चिंचवडगाव येथे उभ्या बसला आग(व्हिडिओ) 

Published On: Dec 06 2017 3:49PM | Last Updated: Dec 06 2017 3:49PM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनधी

चिंचवडगाव येथे उभ्या बसला बुधवारी (दि.6) दुपारी पावणे दोनच्या सुमारास आग लागली. मार्ग क्रमांक 313 वरील चिंचवड ते चांदखेड नेहरूनगर डेपोची बस पूर्ण जळून खाक झाली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दोन अग्नीबंबानी आग विझवली.

काम संपल्यानंतर चालकाने चिंचवडगावतील शहीद अशोक कामटे बसस्थानकावर बस चालू अवस्थेत उभी केली होती. प्रवाशी आणि चालक खाली उतरले असल्याने जीवित हानी झाली नाही.