Wed, Nov 21, 2018 01:07होमपेज › Pune › पिंपरी : मुळा नदीच्या पुलावर बस उलटली; 30 प्रवाशी जखमी

पिंपरी : मुळा नदीच्या पुलावर बस उलटली; 30 प्रवाशी जखमी

Published On: Jul 08 2018 8:20AM | Last Updated: Jul 08 2018 8:20AMपिंपरी : प्रतिनिधी

वाकड येथे मुळा नदीच्या पुलावर कोल्हापूरच्या दिशेने जाणारी बस उलटली. यामध्ये एकूण ३० प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे चारच्या सुमारास घडली. बस पुलाच्या कठड्याला अडकल्याने मोठी हानी टळली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  बोरीवली ते कोल्हापूर अशी एम.बी.लिंक ट्रँव्हसची बस (एम एच ०९-सी व्ही, ३६९७ ) कोल्हापूरच्या दिशेने जात होती. वाकड येथील मुळानदीचे पुलावर चालकाचा ताबा सुटल्याने बस कठड्याला धडकून रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात एकूण ३० प्रवाशांपैकी ८ते १० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.