Fri, Apr 19, 2019 12:36होमपेज › Pune › पुण्यात इमारत कोसळली, ९ जणांना वाचविले(Video)

पुण्यात इमारत कोसळली, ९ जणांना वाचविले(Video)

Published On: Jul 21 2018 1:38PM | Last Updated: Jul 21 2018 4:53PMपुणे : प्रतिनिधी 

सुभाष अबू भांडवलकर यांची 2 मजली इमारत
पुणे : प्रतिनिधी 
केशवनगर येथील संभाजी चौकामध्ये ओढ्याच्या बाजूला सकाळी १२.३० वाजता इमारतीचा पाया खचल्याने इमारत कोसळली. ही दोन मजली इमारत सुभाष अबू भांडवलकर यांची  आहे. ते स्वत: आणि दोन भाडेकरु या इमारतीत रहात होते.

सकाळी साडेबाराच्या सुमारास इमारत कोसळल्याचे समजताच आसपास राहणाऱ्या स्थानिक नागरिक धावून आले. त्यानंतर इमारत कोसळल्याची माहिती पोलिस आणि महानगरपालिका प्रशासनाला देण्यात आली. ते घटना स्थळी पोहचल्यावर मदतकार्य सुरु केले. आतापर्यंत ८ लोकांना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आले आहे. त्यांना नोबल आणि कोलंबिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

दरम्यान, आठ वर्षाचा मुलगा अजुनही ढिगाऱ्याखाली असल्याची माहिती स्थानिक लोक देत आहेत. त्यामुळे ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे. या कामासाठी हडपसर, मुंढवा, वानवडी येथील पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत तसेच एसीपी, डिसीपी देखील घटनास्थळी पोहचले आहेत.