Mon, Jul 15, 2019 23:55होमपेज › Pune › अखेर डीएसके पोलिसांपुढे हजर; चौकशी सुरू (Video)

अखेर डीएसके पोलिसांपुढे हजर; चौकशी सुरू (Video)

Published On: Feb 07 2018 1:46PM | Last Updated: Feb 07 2018 1:49PMपुणे : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी आज (बुधवारी) पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात हजर झाले. आर्थिक गुन्हे शाखेत त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. न्यायालयाने डीएसके दाम्पत्याला अटकपूर्व जामीन मंजूर करताना पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले होते. त्यानुसार बुधवारी ते आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर झाले.

संबंधित बातम्या वाचा

डीएसके राष्ट्रवादीच्या दारी; अजित पवारांनाच साकडे

डीएसकेंसह इतरांना अटकपूर्व जामीन मंजूर

पैसे परत करण्यासाठी मालमत्ता विका अथवा भिक मागा!

ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यासाठी 50 कोटी रुपये न्यायालयात जमा करण्यास असमर्थ ठरलेल्या डीएसके यांना उच्च न्यायालयाने फटकारले असून, आम्हाला तुमची नाही तर सर्व सामान्य गुतंवणूकदारांची काळजी आहे. त्यांचे पैसे परत करण्यासाठी मालमत्ता विका अथवा भिक मागा , लोकांचे पैसे कधी परत करणार लोकांचे पैसे कधी परत करणार याची माहीती द्या, अशा शब्दांत न्यायमूर्तींनी डीएसके यांना सुनावले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या डीएसके यांनी मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे दाद मागितली असून, त्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साकडे घातले आहे. 

आज, आर्थिक गुन्हे शाखेत होणाऱ्या चौकशीतून आणखी काही बाबी पुढे येणार आहेत.