Sat, Apr 20, 2019 09:52होमपेज › Pune › पुणे : लाचप्रकरणी 'शिक्षण'च्या महिला अधिकार्‍यासह लिपिक जाळ्यात 

पुणे : लाचप्रकरणी 'शिक्षण'च्या महिला अधिकार्‍यासह लिपिक जाळ्यात 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

आरटीई (शिक्षणाचा हक्‍क कायदा) अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सरकारकडून मिळणार्‍या अनुदानाचे बिल मंजूर करण्यासाठी लाच घेतल्याचा धक्‍कादायक प्रकार पुढे आला आहे. ५० हजारांची लाच घेताना महिला अधीक्षकासह लिपिकाला एसीबीने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी महिला अधीक्षक शिल्‍पा सुरेश मेनन (वय ४५) आणि महादेव मच्‍छिंद्र सारुख (वय ४७) या लिपिकाला ताब्यात घेण्यात आले आहे. 

सरकारकडून मिळणार्‍या अनुदानाचे बिल मंजूर करून अदा करण्यासाठी मेनन यांनी दीड लाखांची लाच मागितली होती. सांगवी येथल एका शाळेच्या आवारात पहिला हप्‍ता म्‍हणून ५० हजार रुपये स्‍वीकारताना अधीक्षक मेनन आणि लिपिक सारूख यांना रंगेहात पकडले. 

दरम्यान, तक्रारदाराची शिक्षण संस्‍था आहे. त्यांच्याकडे बिल मंजूर करण्यासाठी दीड लाखांची लाच मागितल्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. याची पडताळणी करून लाचलुचपत विभागाने सापळा रचला. त्यानुसार सांगवी येथील शाळेच्या कार्यालयात ५० हजारांची लाच घेताना अधीक्षक महिला अधिकारी व लिपिक यांना पकडले. ही कारवाई पोलिस निरीक्षक अरुण घोडके व उत्तरा जाधव यांच्या पथकाने केली. 

Tags : pune, pune news, education department, bribe case


  •