Fri, Jan 18, 2019 05:44होमपेज › Pune › भाजप आमदारांनी उपोषणातच खाल्‍ले मिठाई, पेढे (video)

भाजप आमदारांनी उपोषणातच खाल्‍ले मिठाई, पेढे

Published On: Apr 12 2018 4:57PM | Last Updated: Apr 12 2018 4:57PMपुणे : प्रतिनिधी

भाजपाचे आमदार भीमराव तापकीर आणि बाळा भेगडे यांनी उपोषणाचे पेढे सर्वांच्या समोरच खाल्ले. पुण्यात गुरूवारी झालेल्या खरीप हंगाम नियोजन व जलयुक्त शिवार अभियान सनियंत्रण समितीची सभा पुण्यात झाली. भाजपाच्या खासदार आणि आमदारांकडून लाक्षणिक उपोषण करण्यात आले असताना पुण्यातील दोन आमदरांनी वेफर्स आणि पेढे खाल्ले. त्यामुळे आमदारांनी उपोषणाचे पेढे खाल्याची चांगलीच चर्चा झाली.

अधिवेशनाचा वेळ वाया गेल्याने, देशभरातील भाजपाच्या खासदार आणि आमदारांकडून लाक्षणिक उपोषण करण्यात आले. पुण्यातदेखील भाजपाचे नेते जमले होते. तापकीर आणि भेगडे या दोन आमदारांनी बैठकीमध्ये टेबलावर ठेवलेल्या सँडविच, वेफर्स आणि मिठाईवर चांगलाच ताव मारला. सोशल मीडियावर काही वेळातच याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु होऊ शकला नाही.