Sat, Jul 20, 2019 08:38होमपेज › Pune › इंद्रायणीत जैववैद्यकीय कचरा 

इंद्रायणीत जैववैद्यकीय कचरा 

Published On: Apr 27 2018 1:08AM | Last Updated: Apr 26 2018 11:36PMइंदोरी  : ऋषिकेश लोंढे

आंबी मावळ येथील इंद्रायणी नदीच्या पात्रात मुदतबाह्य औषधांचा धोकादायक जैववैद्यकीय कचरा  अज्ञातांकडून सर्रासपणे टाकला जात आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी इंदोरी परिसरात देखील असा जैववैद्यकीय कचरा निदर्शनास आला  होता. यांमध्ये वापरून फेकलेले इंजेक्शनच्या सुया, मुदतबाह्य औषधे, अँटीबायोटिकस औषधांच्या बाटल्या, सलाईनच्या प्लास्टिक बॉटल्स आदी अविघटीत कचरा नदीपात्राच्या कडेस उघड्यावर टाकला जात आहे.

कायद्यान्वये रुग्णालयांना नोंदणी डडडुुडकरतानाच जैववैद्यकीय कचरा विल्हेवाटीबाबत उपाययोजना बंधनकारक आहे. असे असूनही नदीपात्रात हा जैववैद्यकीय कचरा टाकण्यात येत आहे. या कचर्‍याची आधुनिक यंत्रणेच्या सहायाने सुरक्षित विल्हेवाट लावली जाणे गरजेचे आहे; परंतु वैद्यकीय व्यवसाय करणारे पैसे वाचविण्यासाठी या कचर्‍याची विल्हेवाट न लावता उघड्यावरच टाकत आहेत. धोकादायक जैववैद्यकीय कचरा उघड्यावर मैदानात, डोंगर कडेला अथवा नदी परिसरात  फेकत  आहेत . नदीवरील पुलावरून रात्रीच्यावेळी अंधाराचा फायदा घेत काही महाभाग रूग्णालयातील कचरा नदीपात्रात फेकत आहेत. आंबी येथे इंद्रायणी नदीत खोक्यात भरलेला धोकादायक जैव वैद्यकीय कचरा जलपर्णीत अडकला होता.असा धोकादायक कचरा नदी प्रदूषणात भर घालतोच त्याचबरोबर तो मानवी आरोग्यासही धोकदायक तसेच घातक ठरतो. 

लोकांचे आरोग्य सुधारावे म्हणून प्रयत्नशील असणार्‍यांकडूनच हे कृत्य घडत असेल, तर असे प्रकार खरोखरच नींदनीय आहेत. हा कचरा कोणाकडून टाकण्यात आला हे प्रदूषण नियंत्रण मंडळाने शोधून दोषींवर करवाई करणे गरजेचे आहे. केली पाहिजे, अशी मागणी आंबी गावातील ग्रामस्थांकडून होत आहे. आंबी-नानोली-वराळे-इंदोरी परिसरात नदीची अवस्था  

गटारगंगा झाली आहे. पाण्याचा रंग काळपट झाला आहे व पाण्यातुन उग्र वास येत आहे. इंद्रायणीचे पाणी पिण्यास अयोग्य झाले आहे. पाण्याचा रंग काळपट झाला असून उग्र वास देखील येत आहे. 

नदीकाठी डासांचा प्रादुर्भाव 

कारखान्याच्या सांडपाण्यातील नायट्रोजन व फॉस्फरस ही  द्रव्ये पाण्यात मिसळली की जलपर्णी वाढते. ही विषारी द्रव्ये पाण्यात मिसळणे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत जलपर्णीची वाढ अनिर्बंधपणे होत राहणार आहे.  शासनाने इंद्रायणी नदीकडे लवकरच लक्ष दिले पाहिजे गावो-गावी जनजागृती केली पाहिजे म्हणजे असा प्रकार होणार नाही;  प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोषींवर कठोर करवाई केली पाहिजे ;   प्रदूषण नियंत्रण मंडळाच मावळ परिसरात दुर्लक्षच झालेले आहे.पवित्र इंद्रायणी आता गटर गंगा झाली आहे. ग्रामीण भागात आरोग्यास घातक जैववैद्यकीय कचरा उघड्यावरच फेकला जातो ही चिंतेची आणि दुर्दैवी घटना आहे.

 

Tags : Pimpri, Pimpri news, Indrayani, biomedical waste,