होमपेज › Pune › स्मार्ट सिटी अंतर्गत सार्वजनिक सायकल प्रकल्पाचा  प्रारंभ

स्मार्ट सिटी अंतर्गत सार्वजनिक सायकल प्रकल्पाचा  प्रारंभ

Published On: Aug 26 2018 2:58PM | Last Updated: Aug 26 2018 2:58PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडमार्फत एरिया बेस डेव्हलपमेंट प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत सार्वजनिक सायकल सुविधा प्रकल्पाचा प्रारंभ आज सकाळी कुंजीर क्रीडांगण कुणाल आयकॉन रोड पिंपळे सौदागर व त्यानंतर राजमाता जिजाऊ उद्यान पिंपळे गुरव येथे  झाला. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पिंपळे सौदागर ते पिंपळे गुरव पर्यंत सायकलने जात पर्यावरणाचा संदेश दिला 

महापौर म्हणाले की ,पिंपळे सौदागर भागाचा स्मार्ट सिटी अंतर्गत समावेश झाला आहे .नागरिकांच्या सहभागातून परिसराचा सौंदर्यात भर पडेल.महापालिका आयुक्त व पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर   म्हणाले की, शहरातील स्मार्ट सिटी अंतर्गतचा हा पहिलाच प्रकल्प आहे पर्यावरणाचे महत्व जाणून त्यामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. नागरिकांच्या सहभागातूनच असे प्रकल्प यशस्वी होतील असे ते म्हणाले.

सायकल शेअरींगचा हा प्रकल्प प्रथमता प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला आहे. त्यानंतर पिंपळे सौदागर परिसरातील १९ व पिंपळे गुरव परिसरातील १५ ठिकाणासह ३४ ठिकाणी राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सुरू झालेल्या या उपक्रमात सहाशे सायकली ठेवण्यात येणार असून पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे व या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

महापौर राहूल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आमदार लक्ष्मण जगताप ,  स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार,  आयुक्त श्रावण हर्डीकर, मनसेचे गटनेते सचिन चिखले, अतिरिक्त आयुक्त  दिलीप गावडे, नीलकंठ पोमन, नगरसेवक नाना काटे ,शत्रूघन काटे ,निर्मला कुटे ,सागर आंघोळकर ,चंदा लोखंडे ,माधवी राजापुरे  ,सीमा चौगुले ,उषा मुंडे ,शशिकांत कदम आदी उपस्थित होते.