Wed, Jan 23, 2019 10:38होमपेज › Pune › भोसरीत तिघांच्या आत्महत्येने खळबळ

भोसरीत तिघांच्या आत्महत्येने खळबळ

Published On: Jan 18 2018 8:29PM | Last Updated: Jan 18 2018 8:29PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड येथील भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका नवदाम्पत्यास, नर्सने आत्महत्या केल्याचे गुरुवारी सायंकाळी उघडकीस आले. नर्सचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे. दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

पिंकी प्रजापती आणि हरिहर हे दाम्पत्य आणि नर्स भारती ठाकरे या तिघांनी आत्महत्या केली आहे. नवदाम्पत्य मूळचे मध्यप्रदेशचे रहिवासी आहेत. दाम्पत्याचे मृतदेह गुळवे वस्ती येथे आणि नर्सचा मृतदेह फायरब्रिगेड जवळील लेडीज होस्टेलमध्ये आढळला.