Sun, Aug 25, 2019 20:04होमपेज › Pune › भांडारकर रस्त्यावर घरफोडी 

भांडारकर रस्त्यावर घरफोडी 

Published On: Jan 08 2018 1:14AM | Last Updated: Jan 08 2018 12:11AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

शहरात अधून-मधून घरफोड्या सुरूच असून भांडारकर रस्त्यावरील उच्चभ्रू सोसायटीतील फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील परदेशी चलन युरो, रोख दोन हजार आणि सोन्याचे दागिने, असा दोन लाख 87 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.  गुरुवारी पहाटेच्या सुमारास हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. भरवस्तीत घुसून चोरटे घरांवर डल्ला मारत असल्याने परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण आहे. 

याप्रकरणी नीती बडवे (67, भांडारकर रोड) यांनी डेक्कन पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीती बडवे या एका महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. भांडारकर रस्त्यावरील संयोगिता अपार्टमेंटमध्ये त्यांचा फ्लॅट आहे. त्या 11 डिसेंबर रोजी फ्लॅटला कुलूप लावून विदेशात गेल्या होत्या. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप उचकटून आत प्रवेश करीत बेडरूममधील कपाटातील युरो चलन, रोख दोन हजार रुपये आणि सोन्याचे दागिने, असा दोन लाख 87 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. त्यानंतर  त्या दि.4 जानेवारी रोजी परतल्या. त्या वेळी हा प्रकार उघडकीस आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ए. एम. खरात करीत आहेत.