Tue, Apr 23, 2019 13:52होमपेज › Pune › भारतात पुण्यापेक्षा चांगली शहरे: श्रावण हर्डीकर

भारतात पुण्यापेक्षा चांगली शहरे: श्रावण हर्डीकर

Published On: Sep 02 2018 1:39AM | Last Updated: Sep 02 2018 1:39AMपिंपरी : प्रतिनिधी

पुण्याशी नेहमी तुलना केली जाते, मात्र भारतात पुण्यापेक्षा चांगली शहरे आहेत. भारतात काय चांगले चालले आहे, ते पाहून पिंपरी-चिंचवडला 2030 पर्यंत भारतातील सर्वसमावेशक आर्थिकदृष्ट्या प्रगत व राहण्यायोग्य शहर करण्यासाठी नियोजन आवश्यक आहे, असे प्रतिपादन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी येथे केले. शहरविकासाचे धोरण व शहर परिवर्तन आराखडा या विषयावर पालिकेतील स्थायी समिती सभागृहात आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. चर्चा सत्रास निमंत्रण न दिल्याने विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी संताप व्यक्त केला. 

महापालिकेत आयोजित या चर्चासत्रास महापालिकेचे संगणक अधिकारी नीळकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त आण्णा बोदाडे, मारुती भापकर, सूर्यकांत मुथीयान आदी उपस्थित होते.  

यावेळी आयुक्त हर्डीकर म्हणाले की, जीवनशैली, संस्थात्मक सामाजिक घटक, भौतिक सुविधा याआधारावर जगण्यायोग्य शहर ठरविले जाते. आपण कुठे आहोत याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल, 

माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून घ्यावा लागेल, कायदा सुव्यवस्थेत सुधारणा करावा लागेल. आयुक्त सल्लागारांचे प्रवक्ते झालेत ः कलाटे 

शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे म्हणाले की, गेल्या दोन-तीन दिवसांतील आयुक्तांच्या बैठका पाहता आयुक्त श्रावण हर्डीकर हे सल्लागारांचे प्रवक्ते झालेत की काय, अशी शंका येते. शहरविकासाचे धोरण व शहर परिवर्तन आराखडा या विषयावर आज पालिकेत आयोजित चर्चा सत्रात त्या-त्या क्षेत्रातील तंज्ञांच्या सूचना विचारात घेऊन त्यांच्या अंतर्भाव करणे अपेक्षित असताना आयुक्त स्वतःच भाषण ठोकत बसले. आपण किती चांगले भाषण करू शकतो, हे दाखविण्याचा आयुक्तांचा प्रयत्न असल्याची टीका कलाटे यांनी केली. आयुक्तांनी सल्लागारांची बाजू घेण्यासाठी आणखी बैठका घ्याव्यात. म्हणजे भाजपला काहीच काम उरणार नाही. आयुक्त हर्डीकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे 2020-2030 अशी भाषा करून गाजर वाटप करत आहेत. असा टोला कलाटे यांनी हाणला. आजच्या बैठकीस पत्रकारांना बोलावण्यात आले, मात्र त्यांना बसायला ही जागा ठेवली नाही यामागे कारस्थान असावे, अशी शंका कलाटे यांनी व्यक्त केली.