Thu, Jul 18, 2019 05:06होमपेज › Pune › बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या वसतिगृहात मुलीची आत्महत्या

बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या वसतिगृहात मुलीची आत्महत्या

Published On: Dec 10 2017 7:25PM | Last Updated: Dec 10 2017 7:25PM

बुकमार्क करा

बारामती : प्रतिनिधी

येथील विद्या प्रतिष्ठानच्या मुलींच्या वसतीगृहामध्ये राहणार्‍या चैत्राली नामदेव होळकर (वय १७, रा. तरडगाव, ता. फलटण, जि. सातारा) या महाविद्यालयीन तरुणीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना रविवारी दि. १० दुपारी घडली. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

याबाबत बारामती तालुका पोलिस ठाण्याला वसतीगृहाचे सुरक्षाप्रमुख राहूल शिवाजी शिंदे यांनी खबर दिली. तरडगाव येथील चैत्राली विद्या प्रतिष्ठानमध्ये शिकत होती. रविवारी दुपारी मुलींच्या वसतीगृहातील खोली क्रमांक ८४ मध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत ती आढळून आली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून उपनिरीक्षक दत्तात्रय भोसले अधिक तपास करत आहेत.