Sat, Jul 20, 2019 23:21होमपेज › Pune › महाराष्ट्र बँकेचे सीईओ रवींद्र मराठे यांना जामीन मंजूर

महाराष्ट्र बँकेचे सीईओ रवींद्र मराठे यांना जामीन मंजूर

Published On: Jun 27 2018 4:16PM | Last Updated: Jun 27 2018 5:20PMपुणे : प्रतिनिधी

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या डीएसकेडीएल कंपनीला नियम डावलून कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ रवींद्र मराठे यांची पन्‍नास हजार रुपयांच्या जामिनावर मुक्‍तता करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी बुधवारी दिले. दरम्यान, या प्रकरणात अटक केलेले बँकचे आजी-माजी अधिकार्‍यांसह पाच जणांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्यांना 11 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याच्या जामीन अर्जावर गुरुवारी (28 जून) सुनावणी होणार आहे.