होमपेज › Pune › अपंगांसाठी लढावे लागते, हे दुर्दैव

अपंगांसाठी लढावे लागते, हे दुर्दैव

Published On: Jan 08 2018 1:15AM | Last Updated: Jan 07 2018 11:25PM

बुकमार्क करा
वडगाव मावळ : वार्ताहर 

आपल्या देशात अपंगांना न्याय व सुविधा मिळवून देण्यासाठी लढावे लागते, हेच मोठे दुर्दैव असल्याचे मत आमदार बच्चू कडू यांनी आज वडगाव मावळ येथे बोलताना केले.
अपंगांच्या प्रश्‍नांसाठी सन 2013 मध्ये श्री क्षेत्र देहू येथे केलेल्या रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर वडगाव न्यायालयात सुरु असलेल्या केससंदर्भात आमदार कडू हे वडगाव मावळ न्यायालयात आले होते. यावेळी येथील वकिल बार असोसिएशनला दिलेल्या सदिच्छा भेटप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी, महाराष्ट व गोवा वकिल बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष विठ्ठल कोंडे-देशमुख, वडगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र गाडेपाटील, सचिव अजित वहिले, माजी जि.प.सदस्य बाळासाहेब कोळोखे, माजी पं.स.सदस्य सुहास गोलांडे, ह.भ.प.जालिंदर काळोखे, जेष्ठ वकिल अ‍ॅड.रविंद्र यादव, अ‍ॅड.अशोक ढोरे, संपत शिंदे, संग्राम भेगडे, चंद्रकांत खांदवे आदि उपस्थित होते.

आमदार कडू पुढे बोलताना म्हणाले, आज समाजात जातीपातीसाठी उद्रेक होताना दिसतो, मात्र आपल्याच जातीतील पिडीताच्या मदतीसाठी मात्र कोणीही पुढे येत नाही अशी खंतही व्यक्त केली. अपंगांच्या प्रश्‍नांसाठी सन 2013 मध्ये जगत्गुरु तुकोबारायांची भुमी असलेल्या श्री क्षेत्र देहू येथून आंदोलन सुरु केले असून आजतागायत लढाच देतो आहे. पण अलिकडच्या काळात कोणतीही चळवळ, आंदोलन करण्यासारखी परिस्थितीच राहिली नसल्याचा उल्लेखही त्यांनी केला.विठ्ठल कोंडे यांनी यावेळी बोलताना वडगाव बार असोसिएशनच्या कामकाजाविषयी विशेष कौतुक करुन या नवीन वर्षात वडगाव न्यायालयात सिनिअर डिव्हीजन सुरु होईल असा विश्‍वासही व्यक्त केला.