Wed, Nov 21, 2018 20:06होमपेज › Pune › उरुळी कांचन येथे तरुणीवर हत्याराने वार 

उरुळी कांचन येथे तरुणीवर हत्याराने वार 

Published On: Jan 22 2018 11:39AM | Last Updated: Jan 22 2018 11:41AMउरुळी कांचन : वार्ताहर

मित्राबरोबर मैत्रिणीचे संपर्क जुळवून देते म्हणून चिडून जाऊन तरुणाने हत्ताराने तरूणीवर वार केल्याचा प्रकार उरुळी कांचन ( ता.हवेली ) येथे घडला. अमोल विलास चौधरी (रा. खेडेकर मळा ,उरुळी कांचन ) असे हल्ला केलेल्या आरोपीचे नाव असून, हल्ला करून आरोपी फरार झाला आहे. या प्रकरणी पिडित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरूळी कांचन, खेडेकर मळावस्तीवरील हॉटेल अशोकापाठिमागे आरोपी अमोल चौधरी याने तरुणीला रस्त्यावर अडवून मित्राला तुझ्या मैत्रिणीचा संपर्क का जुळवून देते म्हणून चिडून जाऊन हत्याराने तरुणीच्या पोटात, हातावर वार केले.  या हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणीला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या गुन्हाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले करीत आहे.