Tue, Oct 24, 2017 16:49होमपेज › Pune › FTIIच्या विद्यार्थ्यांचे नव्या अध्यक्षांना पत्र 

FTIIच्या विद्यार्थ्यांच्या पत्राला अनुपम खेर यांचे उत्तर

Published On: Oct 13 2017 4:22PM | Last Updated: Oct 13 2017 4:22PM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय)च्या नवनिर्वाचीत अध्यक्ष अनुपम खेर यांचे स्वागत विद्यार्थ्यांनी खुल्या पत्राद्वारे केले आहे. एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी एक खास पत्र खेर यांना लिहीले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी काही मुद्यांवर नव्या अध्यक्षांना लक्ष देण्याची विनंती केली आहे.  

अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल तुम्ही शुभेच्छा स्वीकारत असताना आम्ही मात्र संस्थेतील काही मुद्यांवर तुमचे लक्ष वेधू इच्छितो, असे या पत्राच्या सुरुवातीला म्हटले आहे. तसेच, काही मुद्यांवर तुमचे मत जाणून  घ्यायला आम्हाला आवडेल, अशा आशयाचे पत्र विद्यार्थ्यांनी खेर यांना लिहीले आहे. विशेष म्हणजे या खुल्या पत्राला खेर यांनी देखील उत्तर दिले आहे. या संदर्भातील सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची तयारी असल्याचे खेर यांनी म्हटले आहे.   

पत्रातील मुद्दे :

या महिन्याच्या सुरूवातीला सुरू करण्यात आलेला ‘फिक्शन रायटिंग फॉर टेलिव्हीजन’ हा कोर्स २० दिवसांच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आला आहे. या कोर्ससाठी २० हजार इतके शुल्क आकारले जात असून समान्य विद्यार्थ्याला परवडेल असे नाही. 

देशभरात सरकारी शैक्षणीक संस्था सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी आहेत. त्यांनी आर्थिक उत्पादनाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवायला नको. सध्याच्या घडीला इतर शैक्षणीक संस्थांचे जो उद्देश आहे तोच या संस्थांचा असायला हवा, असे आम्हाला वाटते. 

संस्थेच्या स्थापना दिवसला जो कार्यक्रम होतो त्यावर पैसे खर्च न करता तेच पैसे संस्थेची दुरूस्ती, संस्थेत लागणाऱ्या वस्तू आणि उपकरणे यांच्यासाठी खर्च करवेत. ते विद्यार्थ्यांच्या हिताचे असेल.

विद्यार्थ्यांच्या नव्या अभ्यासक्रमातही अनेक समस्या आहेत.  अभ्यासक्रमात शिकवले जाणारे मुद्दे परीक्षा घेण्याआधीच वगळण्यात येतात. 

संस्थेमध्ये अभ्यासक्रम शिकवण्यासाठी शिक्षकांची कमतरता आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम मागे पडत आहे. 

विविध क्षेत्रात काम करणारे अनेक निर्मात्यांना बनवणारी एफटीआयआय ही संस्था आहे. काही लोक स्वत:चा व्यवसाय सुरू करतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना चित्रपटांकडे न जाता उद्योग, व्यवसाय करण्याचा सल्ला दिला जातो. चित्रपटाला कला नाही तर वस्तू म्हणून पाहिले जाते.