Sun, Jul 21, 2019 05:42होमपेज › Pune › पुणे : 'अंकुश लांडगे' प्रकरणातील आरोपीचा खून 

पुणे : 'अंकुश लांडगे' प्रकरणातील आरोपीचा खून 

Published On: Jul 03 2018 9:28AM | Last Updated: Jul 03 2018 9:28AMपिंपरी : प्रतिनिधी

भाजपचे तत्कालीन शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांच्या हत्या प्रकरणातील सराईत गुन्हेगार जितेंद्र साळुंखे याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास अज्ञातांनी  जितेंद्रवर हल्ला केला होता. मध्यरात्री एकच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

जितेंद्र ऊर्फ जितू जितेंद्र रामचंद्र साळुंखे ऊर्फ जितू पुजारी (वय ३२, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे खून झालेल्या  सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्रवर अंकुश लांडगे यांच्या हत्येव्यतिरिक्त बलात्काराचा गुन्हा देखील दाखल होता. यामध्ये त्याला पाच वर्षांची शिक्षा झाली होती. अंकुश लांडगे यांच्या हत्येतील मुख्य आरोपी गोट्या धावडे याच्या बरोबर जितेंद्रला अटक करण्यात आली होती. धावडे याची कालांतराने सुटका झाली. मात्र जितू बलात्काराच्या गुन्ह्यातील शिक्षा भोगत होता.