Thu, Jul 09, 2020 06:54होमपेज › Pune › रामदास आठवले म्हणजे, 'नको असलेला नेता'

रामदास आठवले म्हणजे, 'नको असलेला नेता'

Published On: Jan 16 2018 8:16AM | Last Updated: Jan 16 2018 8:16AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

रामदास आठवले यांचा जनाधार संपला असून ते सत्तेच्या परिघाबाहेर राहू शकत नाहीत, अशी टीका रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी कोरेगाव-भीमा प्रकरणी त्यांनी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरुजींवर मोकाअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

आनंदराज आंबेडकर म्हणाले, कोरेगाव-भीमा येथे आंबेडकरी जनतेने नव्हे तर समाजविघातक व्यक्तींनी कट कारस्थान केले. मात्र, सरकारने आंबेडकरी कार्यकर्त्यांना अटक करून त्यांचे खच्चीकरण करण्याचा लाजिरवाणा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना तात्पुरती अटक करण्याचा शब्द फिरवत त्यांच्यावर कठीण कलम लावले. या प्रकाराला आगामी 2019मध्ये येणार्‍या निवडणुकीत आंबेडकरी जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

ऐक्याचे नाटक खूपदा

रिपब्लिकन पक्षातील ऐक्यावर विचारले असता, त्यांनी ऐक्याचे नाटक खूपदा झाले आहे, अशी प्रतिक्रिया दिली. आता आंबेडकरी जनतेनेच त्यांचा नेता निवडावा. जनमानसात सध्याच्या नेत्यांची प्रतिमा ‘नको असलेला नेता’ अशी झाली आहे, असा टोलाही त्यांनी आठवलेंना लगावला. स्मारकात पारदर्शीपणा नाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अक्षम्य विलंब होत असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले. स्मारकाची रचना करताना कोणालाही विश्‍वासात घेतले जात नाही, इतकेच नव्हे तर सरकार याबाबतीत पारदर्शकता दाखवत नसल्याचे त्यांनी म्हटले.