Sat, Aug 24, 2019 22:19होमपेज › Pune › कलावंतांना आंदोलन करायला लावून रस्त्यावर आणू नका : सुनील महाजन

कलावंतांना आंदोलन करायला लावून रस्त्यावर आणू नका : सुनील महाजन

Published On: Mar 09 2018 2:02PM | Last Updated: Mar 09 2018 2:02PMपुणे : प्रतिनिधी

प्रथम हडपसर येथील विठ्ठलराव तुपे, सिंहगड रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह आणि कोथरूड येथील बाळासाहेब ठाकरे कलामंदिर या अपूर्ण नाट्यगृहांचे बांधकाम पूर्ण करावे आणि त्यानंतर बालगंधर्व रंगमंदिराच्या वास्तूला हात लावावा. या अपूर्ण वास्तूप्रकरणी कलावंतांच्या भावना तीव्र आहेत. येत्या दहा दिवसांत याप्रकरणी महानगरपालिका प्रशासनाचे उत्तर दिले नाही तर तीव्र आंदोरन करु, असा इशारा कोथरूड नाट्य परिषद शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिला आहे. 

कलावंतांना आंदोलन करण्याकरिता रस्त्यावर आणू नका, हीच महानगरपालिकेला मागणी, अशा कठोर शब्दांत त्यांनी प्रशासनाविरोधात  निषेध नोंदवला. कोथरूड परिसरात असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे कालामंदिर या वास्तूचे बांधकाम गेल्या एक वर्षांपासून बंद आहे. नाट्यगृहाची ही अपूर्ण वास्तू पूर्ण करावी आणि त्यानंतर बालगंधर्व रंगमंदिर पाडावे, या मागणीसाठी नाट्यपरिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी आम्ही एकपात्रीचे अध्यक्ष संतोष चोरडिया, शेखर बेंद्रे, समीर हम्पी, श्रीराम रानडे, मंजुश्री ओक, संदीप चव्हाण, शेखर केदारी, सुभाष चित्रे, दीपक पवार, अक्षय जगताप, अजय पैठणकर, भैरवनाथ शेरखान, वंदन नगरकर उपस्थित होते.

सुनील महाजन म्हणाले, बाळासाहेब ठाकरे कालामंदिराचे बांधकाम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. यंदा महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात आम्ही १० कोटी मागितले; मात्र फक्त ३ कोटी मिळाले. त्यातील २ कोटी मागील बाकी रक्कमेतील आहेत. त्यामुळे कलामंदिराच्या बांधकामासाठी फक्त १ कोटी उरेल. हे कलामंदिर २३ जानेवारी २०१८ ला पूर्ण करू, असे आश्वासन महानगरपालिकेतर्फे देण्यात आले होते. या अपूर्ण वास्तूमुळे पुणेकरांचा कराचा पैसा वाया जातो आहे.

कलामंदिर हे कलावंतांचे फुफ्फुस असतात. या फुफ्फुसांनी काम नाही केले, तर शय व्हायला वेळ लागणार नाही. आधी नाट्यगृहांचे अपूर्ण काम आहे ते पूर्ण करा. त्यानंतर, इतर वास्तुंना हात लावा.बालगंधर्व रंगमंदिर पुनरुज्जीवित करण्याचे जाहीर करायाचे आणि त्यानंतर कलावंतांचा या प्रकरणी सल्ला घ्यायचा, ही पालिका प्रशासनाची चुकीची बाब आहे. हा प्रातिनिधिक मोर्चा आहे. आमच्या कलावंतांच गाऱ्हाणं महानगरपालिकेने ऐकावं, असे ‎श्रीराम रानडे म्हणाले.