Tue, Mar 19, 2019 05:11होमपेज › Pune › पळवापळवीची भाषा करणाऱ्यांना जागा दाखवा : अजित पवार 

पळवापळवीची भाषा करणाऱ्यांना जागा दाखवा : अजित पवार 

Published On: Sep 07 2018 4:16PM | Last Updated: Sep 07 2018 4:16PMपुणे : प्रतिनिधी 

मुलींची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, सरकारमधील लोक निर्लज्ज पणे वागत आहेत. बेताल वक्तव्य केली जात आहेत. मुलीला पळवून आणून देतो म्हणणाऱ्यांच्या बापाच्या घरची ठेव आहे का? अशी जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात केली. भाजपच्या प्रवक्तयाला कुठली मस्ती आली आहे. पक्षाच्या प्रवक्त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची चुप्पी काळजी करणारी आहे.  पळवापळवीची भाषा करणााऱ्यांना जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे, असेही पवार यावेळी म्हणाले. 

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सेवक सहकारी पतसंस्था वार्षिक सर्वसाधारण सभा आणि संस्था वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी पवार म्हणाले, महिलांना समान  बरोबरीची संधी दिल्‍याने मुलींनी खूप प्रगती केली आहे. मात्र, सरकारमधील लोक महिलांब्द्दल बेताल वक्तव्य करत आहेत.  महिलांकडे आदराने पाहण्याची आवश्यकता आहे. सरकारच्या शिक्षणाच्या चुकीच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. आरटीईची अमलबजावणी करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. एससी एसटी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाहीत. त्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती देणे आवश्यक असून, क्रीडा शिक्षकांच्या जागा भरणे आवश्यक आहे. शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांच्यात भेदभाव होत असून चुकीच्या धोरणामुळे विद्यार्थी शिकणापासून वंचित राहत आहेत. शाळेतील संगणक लॅब शोभेच्या वस्तु झाल्याची परिस्थिती आहे, अशी टीका पवार यांनी यावेळी केली.